जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव व प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्या सौजन्याने रोटरी भवन, मायादेवी नगर येथे सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहात झाला. याप्रसंगी कार्यक्रमास प.पूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज फैजपूर, महापौर जयश्रीताई महाजन जळगाव, आमदार राजू मामा भोळे, डॉ.गौरव महाजन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात एकूण 110 गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र तसेच ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, अॅड. सीमा जाधव, नूतन तासखेडकर, श्रावणी पाटील, प्रतीक्षा पाटील, लीना पाटील, राधिका पाटील, अॅड. संगीता देशमुख, रेणुका हिंगू, शशी शर्मा,विद्या जकातदार, नेहा जगताप, सपना पाटील, संगीता चौधरी,आशा मौर्य, मंदा सोनवणे, अर्चना पाटील, संगीता चौधरी, वंदना मंडावरे, हर्षा गुजराती, माधुरी शिंपी, नीता वानखेडकर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा पाटील यांनी केले. अत्यंत बहारदार व खुमासदार सूत्रसंचालन कलावंत तुषार वाघुळदे यांनी केले त्यांनी शेरोशायरी करून दाद मिळवली त्यांच्या सोबत मंजुषा अडावदकर यांनीही निवेदन केले. श्री.वाघुळदे यांचे महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी आजचे विशेष कौतुक करून सुहृदयही सत्कार केला तर आभार श्रीमती प्रतीक्षा पाटील यांनी मानले.