Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावमिलिंद दुसाने यांच्याकडे जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार

मिलिंद दुसाने यांच्याकडे जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार

जळगाव/कार्यकारी संपादक/तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्हा माहिती अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार मिलिंद दुसाने आणि माहिती अधिकारी पदाचा कार्यभार सुरेश पाटील यांनी आज सायंकाळी स्विकारला. जळगाव जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची नाशिक येथे बदली झाल्याने त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांच्याकडे देण्यात आला आहे. माहिती अधिकारी श्रीमती शैलजा देशमुख यांची डहाणू येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर उप माहिती कार्यालय, शिर्डी, जि.अहमदनगर येथील माहिती अधिकारी सुरेश पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. मिलिंद दुसाने आणि सुरेश पाटील यांचे पोलीस दक्षता लाईव्ह टीमच्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन …!

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या