Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedहिरवा सातपुडा उपक्रमांतर्गत पाल येथे १०० वृक्षांची लागवड

हिरवा सातपुडा उपक्रमांतर्गत पाल येथे १०० वृक्षांची लागवड

पाल ( ता.रावेर ) प्रतिनिधी/,पोलीस दक्षता लाईव्ह:- सातपुड़ा विकास मंडळ, पाल या सेवाभावी संस्थेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम झाला. हिरवा सातपुडा या उपक्रमांतर्गत 100 वृक्षांची लागवड पाल परिसरातील मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी आमदार श्री.चौधरी आणि मधूस्नेह संस्था परिवारातील विविध शाखांचे पदाधिकारी,शाखा प्रमुख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. वर्धापदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या उभारणीसाठी ज्या-ज्या विभुतींनी कार्य केले,त्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कै.धनाजी नाना चौधरी कै.भाऊसाहेब बोंडे, स्व. बाळासाहेब चौधरी, कै. सुनीतभाई बोंडे, कै. खुशाल पाटील,स्व. वजिरभाई तडवी,स्व. साहेबू अल्लाबक्ष तडवी, कै.का.म.फिरके, कै. आर.डी.चौधरी या थोर विभूतींचे स्मरण यावेळी करण्यात आले. आमदार शिरीष चौधरी म्हणाले, माझी एंजिओप्लास्टी झाल्याने व हॉस्पिटलमध्ये असल्याने गुरू पौर्णिमेच्या कार्यक्रमाला मी या वर्षी येऊ शकलो नव्हतो..आज वृंदावन धाम पाल येथे ब्रम्हलीन संत प.पू.लक्ष्मण चैतन्यजी बापूजीचे दर्शन घेऊन शिव चैत्यनजी महाराज,नवीनीत चैतन्यजी महाराजांचे आशिर्वाद घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या