पाचोरा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पाचोरा तालुका विधी सेवा समिती पाचोरा आणि पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा येथील शिंदे इंटरनँशनल स्कुल येथे पोक्सो कायदा या विषयावर आधारित मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाचोरा न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश जी. बी औंधकर,एम. जी. हिवराळे ,एल. व्ही. श्रीखंडे तसेच अन्य मान्यवर आवर्जून उपस्थित होते. यावेळी समस्त मान्यवरांनी पोक्सो कायदयाबद्दल आपल्या प्रभावी, सखोल, मार्गदर्शनातून वेगवेगळे पैलू उलगडले. अतिशय बहारदार व सर्वांनाच खिळवून ठेवणारा असा हा आगळा-वेगळा उपक्रम ठरला.