Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापडघा खडावली फाट्याजवळ कंटेनर- काली पिली अपघातात सहा ठार; तीन जखमी

पडघा खडावली फाट्याजवळ कंटेनर- काली पिली अपघातात सहा ठार; तीन जखमी

कल्याण/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- खडावली जवळ १८ जुलै२३ रोजी भीषण अपघात झाला आहे.सकाळी ६:३० च्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील पडघा खडावली फाट्याजवळ कंटेनर एम.एच.४८ टी ७५३२ व काळी पिवळी जीप एम एच ०४ ई १७७१ विद्यार्थी घेऊन पडघा वरुन खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना भीषण अपघात झाला. त्यामध्ये खालीलप्रमाणे जखमी व मयत झाले आहेत. सहा जण मृत्यूमुखी झाले.तर तीन जखमी झाले. यात जळगाव जिल्ह्यातील न्हावी येथील रहिवाशी हल्ली मुक्काम पडघा प्रज्वल शंकर फिरके वय २२ हा विद्यार्थी मयत झाला आहे. न्हावी गावात शोककळा पसरली आहे. या अपघातात चिन्मयी विकास शिंदे वय १५, रिया किशोर परदेशी, चैताली सुशांत पिंपळे – वय २७, संतोष अनंत जाधव – वय ५०, वसंत धर्मा जाधव – वय ५०, प्रज्वल शंकर फिरके वय २२ हे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दिलीप कुमार विश्वकर्मा वय २९, चेतना गणेश जसे वय १९ जखमी,कुणाल ज्ञानेश्वर भामरे वय २२ जखमी असून त्यांना भिवंडी येथील मायरा हॉस्पिटल मध्ये जखमी रुग्णांवर उपचार चालू आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या