Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमदहा हजाराची लाच घेताना ग्रामसेविका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

दहा हजाराची लाच घेताना ग्रामसेविका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- हॉटेल व लॉजिगसाठी आवश्यक असलेला ग्रामपंचायतचा ठराव आणि ना हरकत दाखला देण्यासाठी दहा हजाराची लाच घेणाऱ्या ग्रामसेविकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात पकडले.श्रीमती किर्ती अर्जुनराव वांगीकर, वय ४३ वर्षे, पद- ग्रामसेवक, ग्रामपंचायत अकोलेकाटी ता.उत्तर सोलापूर असे रंगेहात पकडण्यात आलेल्या ग्रामसेविकेचे नाव आहे. यातील प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदार यांचे हॉटेल तसेच लॉजिंगसाठी आवश्यक असलेला ग्रामपंचायतचा ठराव आणि एन.ओ.सी. देण्यासाठी लोकसेवक श्रीमती किर्ती अर्जुनराव वांगीकर ग्रामसेवक, ग्रामपंचायत अकोलेकाटी ता.उत्तर सोलापूर यांनी १०,००० रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम पंचायत समिती उत्तर सोलापूर या कार्यालयात दिनांक १७ जुलै रोजी स्वतः स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्यांचेवर बझार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक सोलापूर. पोलीस अंमलदार मल्लीनाथ चडचणकर, शिरीषकुमार सोनवणे, पोह रशीद बाणेवाले, पोलीस नाईक श्रीराम घुगे, राजु पवार चालक राहुल गायकवाड सर्वजण अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या