नशिराबाद/मुख्य संपादक चंदन पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथे दि.१६ जुलै रोजी नवरदेव व नवरी या दोघं बाजूकडील वऱ्हाडी मंडळी लग्नाची तारीख ठरवायला आले असता विवाह पार पाडण्याच्या मुलाच्या मामाच्या मागणीला होकार देऊन, लग्नाला मान्यता दिल्यानंतर समाजात एक नवीन आदर्श घडवीत आदर्श विवाह थाटात पार पडला.
सविस्तर वृत्त असे की, नशिराबाद येथे मरहुम अब्दुल सईद अब्दुल गनी यांच्या कुटुंबाकडून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. मुलगी पाहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना मुलगी पसंत असल्याने तारीख ठरविण्यासाठी सर्व मंडळी एकत्र जमली असताना मुलाचे मामा सईद जीलानी यांनी मुलीचे काका अब्दुल रऊफ यांच्याजवळ एक प्रस्ताव ठेवला की आज इथे सर्व जण जमले आहेत, तर आपण आजच विवाह करून टाकायला काय हरकत आहे. यावर मुलाच्या काकाने सुद्धा होकार दिला. या लग्नात कोणत्याही प्रकारचा खर्च न करता, हुंडा न घेता आज जमलेल्या सर्व पाहुण्या मंडळी समोरच विवाह करण्याच्या मुलीच्या मामाच्या या मागणीला सर्व पाहुण्या मंडळींनी मंजुरी दिली. आणि अशा प्रकारे समाजात दुल्हन सीमा नाज आणि दुल्हा शेर अली मासूम अली यांचा एक आदर्श घडविणारा विवाह हा नशिराबाद येथे थाटात पार पडला. या विवाहाच्या वेळी साक्षीदार म्हणून लियाकत अली युसुफ अली, सईद जिलानी, इस्माईल बेग हे उपस्थित होते. या विवाहाची परिसरात एकच चर्चा सुरू असून बऱ्याच लोकांनी अशाच प्रकारे विवाह करण्याचा निर्धारही केला आहे.या विवाहाच्या वेळेस शेख आयुब शेख मिया, बरकत अली, लियाकत अली युसुफ अली, शेख नदीम शेख गोगा, शेख साबीर शेख बशीर, शाबुद्दीन शेख रहिमोद्दिन, हारुण खाटीक, शेख मुस्ताक नजीर, अज्जू पिंजारी, चांद मेंबर, बाला मेंबर, नुरा मिस्तरी, कलंदर मिस्तरी भंगारवाले,शेख अमजद, मुन्ना तेली भुसावळ, पप्पू शेठ, माजी नगराध्यक्ष भुसावळ अक्तर पिंजारी, जमील खान, मेहमूद अब्दुल गनी, मुश्ताक पिंजारी इत्यादी मान्यवरांनी या आदर्श विवाहाचे साक्षीदार होऊन दुल्हा दुल्हन यांना आशिर्वाद दिले.