Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedअक्कलकोट मतदार संघातील १६ रस्त्यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर

अक्कलकोट मतदार संघातील १६ रस्त्यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर

सोलापूर /जिल्हा प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अक्क्कलकोट विधानसभा मतदारसंघातील १६ रस्त्यांच्या कामासाठी सध्याच्या अर्थसंकल्पात २५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तसेच काही रस्ते आहेत. पण सत्ताबदल झाल्यानंतर हळूहळू अनेकरस्त्यांना निधी मिळत आहे. कोरोनाच्या अडचणीचा काळ संपल्यानंतर आमदार कल्याणशेट्टी यांनी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजनांमधून मतदारसंघातील अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.आत्ता जुलैच्या 2024 अर्थसंकल्पात पुन्हा रस्त्याच्या सुधारणा कामासाठी सतत पाठपुरावा करून २५ कोटी एवढा मोठा निधी मिळविला आहे.

कामाचे नाव व तरतूद निधी याप्रमाणे-

(1)दोड्याळ ते जेऊर रस्ता १ कोटी
(2)देवीकवठे- म्हैसलगी ते खानापूर – 4 कोटी
(3)कुंभारवस्ती ते हिळ्ळी रस्ता- ४ कोटी,
(4)सुलेरजवळगे – मंगरुळ ते देवीकवठे रस्ता- २ कोटी,
(5) उळे ते कासेगाव रस्ता-३ कोटी,
(6) कासेगाव ते वडजी रस्ता- २.५ कोटी,
(7) बोरोटी स्टेशन ते बोरोटी व बबलाद गावाजवळील भाग रस्ता- २ कोटी,
(8) घुंगरेगाव ते शावळ रस्ता- १.५ कोटी,
(9)तांदूळवाडी ते वडजी रस्ता -५० लाख,
(10) किरनळ्ळी ते बोळेगांव तालुका हद्द रस्ता-४० लाख,
(11) बोरामणी ते वरळेगाव रस्ता -१ कोटी,
(12) बबलाद ते (परमानंद तांडा) माशाळ रस्ता -१ कोटी,
(13) गौडगाव बु. ते हंद्राळ रस्ता -४० लाख,
(14) मिरजगी ते जकापूर रस्ता -८० लाख,
(15) प्रजिमा- १४७ ते वरळेगाव रस्ता- ५० लाख,
(16) तिल्हेहाळ बस स्टॅड ते स्मशानभूमी रस्ता -४० लाख.

हा निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले. आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांचे मुलभूत हक्क (रस्ते,विज,,पाणी) संघर्ष समिती, अध्यक्ष, सचिव आणि सर्व सदस्य गावकरी मंडळीतर्फे आभार मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या