बुलडाणा/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भ्रातृमंडळ बुलडाणा तर्फे नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असतात. ११/१२ वी (JEE/NEET/CET) ची तयारी करणाऱ्या होतकरु विद्यार्थ्यांना दिनाक २२ जुलै रोजी विनामूल्य पुस्तके वितरित करण्यात आलीत. हर्षल विलास पाचपांडे-JEE (बुलढाणा),प्रथमेश विलास महाजन-CET (दाताळा),ओम अमोल खर्चे-NEET-JEE (शे. बाजार),ज्ञानेश्वर अनंता पाटील-CET (बुलढाणा) या विद्यार्थ्यांना आज एकूण ११० नग पुस्तके असलेली चार संच वितरित करण्यात आली. या पुस्तकांचे तीन संच (आकाश/करिअर पाॅईंट/एररलेस/एनसीईआरटी) संजयकुमार खर्चे (आयटीआय-बुलढाणा) व पुस्तकांचा एक संच (करीअर पाॅईंट) पी.आर. कोलते (बुलढाणा) यांनी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्याचे हार्दिक आभार मानण्यात आले. पुस्तक वितरण कार्यक्रम भ्रातृमंडळ बुलडाणा येथे भ्रातृमंडळाचे अध्यक्ष डी. टी.खाचणे , सचिव डी.के. देशमुख, उपाध्यक्ष गणेश पाटील , तसेच श्रीकांत नारखेडे, संजयकुमार खर्चे, सुनील वराडे,चंद्रकांत महाजन अनिल वासुदेव पाटील यांचे उपस्थितीत पार पडला.