अमळनेर/धवल वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात मारहाणीच्या तसेच खून ,चोऱ्यांच्या घटनेत वाढ झाली आहे.आता तर कायद्याचे अभ्यासक म्हटले जाणारे वकील सुद्धा मागे राहिलेले नाहीत.अशीच घटना घडली आहे.त्यात वकिलाने चक्क एका महिलेस मारहाण केली आहे. या घटनेची चर्चा होत आहे. अमळनेर तालुक्यातील कलाली येथे एका महिलेस आणि तिच्या मुलाला जातीवाचक शिवीगाळ करून तसेच, मारहाण केल्याप्रकरणी वकिलासह त्यांच्या मुलावर मारवाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गाबाई भगवान भिल (वय ५०, रा. कलाली ता. अमळनेर) या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचा मुलगा सुदाम भगवान भिल हा जुन्या ग्रामपंचायतीजवळ मजुरांसोबत बसलेला होता. तेव्हा संशयित आरोपी ऍड.पद्माकर पाटील व त्यांचा मुलगा दादू यांनी त्याला शेतात कामासाठी येण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून त्याला शिवीगाळ केली.तसेच त्याला बसलेल्या वाहनातन बाहेर काढीत मारहाण करू लागले.तेथे सुदाम भिल याची आई फिर्यादी महिला आल्या असता त्यांनाही संशयित ऍड.पद्माकर पाटील तसेच त्यांच्या मुलाने मारहाण आणि शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी महिलेने मारवाड पोलीस स्टेशन गाठले. शुक्रवारी २१ रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. तपास स्वतः पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर हे करीत आहेत.