Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावघर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी सव्वा लाखांचा ऐवज पळवला

घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी सव्वा लाखांचा ऐवज पळवला

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात चोरट्यांनी सध्या सर्वत्र उच्छाद मांडला आहे.घर बंद असल्याची संधी चोरटे साधत असून शिवाजीनगर, हुडको भागात चोरट्यांनी एक लाख २२ हजारांची रोकड लांबवली. याप्रकरणी शनिवार, २२ जुलै रोजी रात्री शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवाजी नगर हुडको परिसरात चालक चांद खान इमाम खान (५०) हे परिवारासह वास्तव्याला आहेत. रविवार, १६ जुलै रोजी ते अमरावती जिल्ह्यात एका गावी गेले होते. त्यावेळी १६ जुलै ते २० जुलै दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे पाहत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात एका लिफाफ्यामध्ये ठेवलेले एक लाख २२ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. खान हे घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी त्यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदवली.घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शनिवारी रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विजय निकुंभ करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या