Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मलकापूर तालुक्यातील विविध धरणगाव, अनुराबाद, खेड्यात जाऊन केली पाहणी

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मलकापूर तालुक्यातील विविध धरणगाव, अनुराबाद, खेड्यात जाऊन केली पाहणी

मलकापूर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- बुलडाणा जिल्ह्यात पाऊसाची झडी लागून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मलकापूर तालुक्यातील धरणगाव, अनुराबाद, झोडगा, हरसोडा, काळेगाव, पान्हेरा, वढोदा आदी ठिकाणी खासदार रक्षा खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या, आणि स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला.

दि.१८ व १९ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध भागात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.मलकापूर तालुक्यात अनेक गांवात उभ्या पिकांचे, राहत्या घरांचे व रस्त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी योग्य तो प्रयत्न करणार असल्याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना आश्वासन दिले. तसेच यावेळी पान्हेरा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, मलकापूर संचालकांच्या वतीने नुकसानग्रस्तांना धान्य किट वाटप करण्यात आले. यावेळी शिवचंद्र तायडे, माजी जि.प.सदस्य विलास पाटील,अमृत बोंबटकर, तालुकाध्यक्ष संजय काजळे, शहराध्यक्ष मिलिंद डवले, सुनील अग्रवल, सुभाष पाटील,चंद्रशेखर तायडे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या