Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगावच्या बीजे मार्केट मधून मोटारसायकलची चोरी

जळगावच्या बीजे मार्केट मधून मोटारसायकलची चोरी

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील नवीन बी. जे. मार्केट परिसरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुकदेव यशवंत सोनवणे (वय ४८) रा. बालाजीपेठ,सराफबाजार, जळगाव हे व्यक्ती आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. सुकदेव सोनवणे हे दुचाकी (एमएच १९ बीएच ८४२३) ने शहरातील बी. जे. मार्केट परिसरात कामाच्या निमित्ताने आले. त्यांनी त्यांची दुचाकी बी. जे. मार्केट मधील विजय पान दुकानासमोर पार्कींग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने पार्कींगला लावलेली दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या