Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावभागपूर येथील जमीन भूसंपादन करताना वाजवी दर मिळावा; ग्रामस्थांची आग्रही मागणी

भागपूर येथील जमीन भूसंपादन करताना वाजवी दर मिळावा; ग्रामस्थांची आग्रही मागणी

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भागपूर येथील ग्रामस्थांनी विशेष भूसंपादन अधिकारी वर्ग-१ यांना निवेदन देत जमिनीला योग्य दर द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की,आम्ही भागपूर शिवारातील कायमस्वरूपी रहिवाशी आहे. सदर भागपूर शिवार हे भूसंपादन प्रस्ताव २३८/२०२२ अंतर्गत आमची स्वमालकी हक्काचे/ वारसांचे असून उपसा सिंचन योजना अंतर्गत भागपूर गांव बुडीत क्षेत्रात धरणाच्या जलाशयासाठी गृहसंपादन घेण्यात आलेले आहे. मालमत्त्ता, बांधीव / बखळ क्षेत्र या प्रकल्पासाठी संपादीत होत आहे. सदरचे घरे हे वडिलोपार्जीत असल्याकारणाने एकंदरीत वारसदार उपभोग आतापर्यंत घेत आहेत. संबंधीत शेतजमीन ही जर उपसा सिंचन योजना भागपूर बुडीत क्षेत्रासाठी संपादीत झाल्यास भविष्यात या ठिकाणी खूप मोठे धरण बांधले जाणार आहे. या पाण्यामुळे इतरत्र जवळपास १०० ते १५० गावांचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्यानंतर आजुबाजुच्या शेतजमिनींना देखील त्या पाण्याचा फायदाच होणार आहे आणि आजूबाजूच्या शेतजमिनीतील उत्पन्न हे चार पटीने वाढून येणार आहे. या पाण्याचा जळगांव शहर व इतर आजूबाजूचे चार ते पाच तालुके यांनाही या जमिनीपासून फायदा होणार आहे. तसेच उत्पन्नाची टक्केवारी मध्ये फरक पडणार आहे. परंतु मात्र आमची वडिलोपार्जीत मालमत्ता घर / दखळ जागा ही आमच्यापासून हिरावल्यास किंवा संपादित झाल्यास आमचे खूप काही कधीही न भरून निघणारे नुकसान होणार आहे.

सदर घर / बखळ जागा हिचा आज रोजी आम्ही वापर करीत आहोत. आज रोजी त्याठिकाणी आम्ही लोक राहात आहोत. आमचा परिवार जवळपास २०० वर्षांपासून त्याठिकाणी राहात असून, ती जमीन संपादित झाल्यास आमचे खूप मोठे नुकसान होणार आहे. जळगांव तालुक्यातील आणि जळगांवजवळ असलेले हे गाव आहे. त्यामुळे जळगांव शहरानजीक येत असल्याकारणाने जळगांव शहरातल्या एन.ए. झालेल्या जमिनींना जो दर आहे, तोच दर हा आमच्या जमिनींना घर तसेच बखळ जागा यांना देण्यात यावा. जमीन ही आज रोजी जळगांव शहरापासून केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे. सदर जमिनीपासून पाच कि.मी. दूर अंतरावर विमानतळ विमानसेवा देखील आहे .जळगांव व औरंगाबाद महामार्ग जवळ आहे.
५ कि.मी. अंतरावर महामार्ग क्र.६ व ऐतिहासिक वारसा लाभलेले नशिराबाद शहर किमान ५ कि.मी. दूर अंतरावर आहे. त्यामुळे जळगांव शहर व कृषी उत्पन्न बाजार समिती हे नजीक असल्याकारणाने दळण वळणाचे साधन किमान १ ते २ कि.मी.अंतरावर असल्याकारणाने आम्हाला कोणत्याही शेतातील माल हा लवकरात लवकर बाजारपेठेपर्यंत नेवून सोडता येतो. भागपूर हे गाव उमाळा शिवाराला लागून व नशिराबाद शिवाराला लागून आहे. या दोन्ही गावांना राष्ट्रीय महामार्ग जात असल्याकारणाने या गावाच्या जवळ असलेले एन.ए. प्लॉट तसेच आमचे गावापासून ५ कि.मी.च्या आतमध्ये झालेले एन.ए. प्लॉट यांचा खरेदी खतांचा विचार केला असता त्यामध्ये ५,००० स्क्वेअर फुट प्रमाणे भाव सुरू आहे. तसेच एम.आय. डी. सी. जवळ आहे. एम.आय.डी.सी.चा आजूबाजूचा परिसर गावा जवळच आहे. त्या जमिनींचे देखील भूसंपादन अधिकारी यांनी त्या खरेदीखतांचा विचार करून आम्हांस आज रोजी दर देण्यात यावा. आज रोजी तेथे उमाळा शिवारात आणि भागपूर शिवारात कारखाने असल्यामुळे घर तसेच बखळ जागा यांचे मूल्य वाढलेले आहे. सदर मे. भूसंपादन अधिकारी यांना हरकतीद्वारे कळविण्यात येते की,येथील जमिनीचा दर हा भविष्याचा विचार करुनच ठरवावा. रू.५,००० स्क्वेअर फूट प्रमाणे आमच्या घरांना तसेच बखळ जागेला योग्यरित्या नुकसान भरपाईचा मोबदला देण्यात यावा. अशी हरकत भागपुर येथील ग्रामस्थांनी घेतली आहे ,असे निवेदन त्यांनी विशेष भूसंपादन अधिकारी वर्ग-१ यांच्याकडे दिले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या