Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रसांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या रंगभूमी उपसमितीची छ.संभाजीनगर येथे २७ ला बैठक

सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या रंगभूमी उपसमितीची छ.संभाजीनगर येथे २७ ला बैठक

मुंबई/ विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचे पुनर्विलोकन सुरू आहे. त्यासाठी एक समिती आणि विषयवार दहा उपसमित्या गठित करण्यात आल्या आहेत. त्यातील रंगभूमी उपसमिती दि.27 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर येत आहे. रंगकर्मींनी या उपसमितीसमोर सांस्कृतिक धोरणासंदर्भातील आपली निवेदने आणि सूचना सादर कराव्यात असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करण्यात आले आहे.राज्याच्या सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या रंगभूमी उपसमितीची बैठक गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्याविरुद्ध बाजूला राजनगरमधील हॉटेल द स्काय कोर्टच्या मारी गोल्ड हॉलमध्ये ही बैठक सकाळी ११ वा. सुरू होईल.या बैठकीमध्ये काळाच्या ओघात बदलणारे सांस्कृतिक बाबींचे स्वरूप, नाट्य क्षेत्रातील बदल नाट्यकर्मींच्या अडचणी ,त्यांच्या सूचना इत्यादी विचारात घेतल्या जातील.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या