Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामारवड येथे शेतीच्या वादातून हाणामारी; दोन जखमी

मारवड येथे शेतीच्या वादातून हाणामारी; दोन जखमी

अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात विविध तालुक्यात लहान-मोठ्या हाणामारीच्या घटना घडत आहेत. मारवड येथे शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीप्रकरणी दोघे जखमी झाले आहेत. दुसऱ्या गटातर्फे तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर एकनाथ बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २१ रोजी त्यांचा मुलगा योगेश व प्रशांत हे शेतात काम करत असताना शेजारील शेतकरी रवींद्र बडगुजर याने त्यांना सांगितले की, मशागत करताना तुझे बैल आमच्या शेतात यायला नको, त्यावर योगेश याने त्यास ” तुमची बैलजोडी मशागत सुरू असताना आमच्या शेतात आली होती. आमचे बैल सुद्धा तुमच्या शेतात येतील,”असे सांगितले. त्याचा राग आल्याने रवींद्र याने शिवीगाळ केली व निघून गेला. त्यानतंर फिर्यादी तसेच त्याचा भाऊ आत्माराम एकनाथ बडगुजर हे शेतात रवींद्र यास समजावण्यासाठी गेले असता त्यावेळी रविंद्रसह त्याची मुले घनशाम आणि गिरीश ही आली व ” तू काय दादागिरी दाखवतो ” असे म्हणत तिघांनी फिर्यादी आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण केली. त्यात फिर्यादीचे डोके फुटले. त्याच्या भावाच्या नाकाला दुखापत झाली आहे. दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर त्यांनी मारवड पोलीसात रवींद्र बडगुजर, घनशाम बडगुजर, व गिरीश बडगुजर यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. मारवड पोलिसांत विविध कलमानव्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अमळनेर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या