पाचोरा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- तालुका विधी सेवा समिती पाचोरा व तालुका वकील संघ, पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने बालिका दिनाच्या अनुषंगाने ” बेटी बचाओ.. बेटी पढाओ ” या अभियानांतर्गत भव्य दिव्य रँलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश जी. बी.औंधकर, न्यायाधीश एम. जी. हिवराळे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड.प्रविण पाटील, विधिज्ञगण, समस्त न्यायालयीन सहकारी बंधू-भगिनी, गो.से. विद्यालयाच्या मुख्याध्यापक प्रमिला वाघ, विद्यालयाचे शिक्षक तथा शिक्षेकेतर कर्मचारी, समस्त विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. न्यायाधीश जी.बी.औंधकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रँलीची सुरुवात केली. ” बेटी बचाओ.. बेटी पढाओ ” यावर आधारित घोषवाक्यांच्या गजराने अवघे पाचोरा शहर दुमदुमले. शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गो.से. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी भ्रूणहत्येवर आधारित भावस्पर्शी पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.