Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यादळवेल येथे चोरट्यांनी लांबवले सोने व आठ लाखांची रोकड

दळवेल येथे चोरट्यांनी लांबवले सोने व आठ लाखांची रोकड

पारोळा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात दरोडे,खून वाढतच चालले आहेत.पारोळा तालुक्यातील दळवेल येथील शेतकरी कुटुंबाच्या घरातून चोरट्यांनी सोने तसेच कापसाची आलेली रक्कम असा आठ लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, शेतकरी दीपक पांडुरंग पाटील (रा. दळवेल) हे शनिवारी ता. २९ नेहमीप्रमाणे घरातली सर्व कामे आटोपून शेतीकामासाठी कुटुंबीयांसह घरातून निघाले. दुपारी साडेअकराच्या सुमारास चोरट्याने लक्ष ठेवून घरातील पुढच्या दरवाजाला लावलेली असलेले कुलूप चावीच्या सहाय्याने उघडले. घरात असलेल्या लोखंडी कपाटाची तिजोरीदेखील चावीच्या साह्याने उघडले. त्यात असलेले पोत, चार अंगठ्या, असे १४ तोळे सोने, सव्वादोन लाख रुपये एकूण रोख आठ लाख रुपयाचा ऐवज लंपास केला. काही महिन्यापूर्वी कापूस विक्रीतून आलेले पैसे दीपक पाटील यांनी घरातच ठेवले होते.
चोरट्यांनी घेत आठ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. याबाबत घटनास्थळी पारोळा पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. यानंतर श्वान पथकही दाखल करण्यात आले. तसेच फिंगरप्रिंटचे पथक आले होते. या बाबत गावातील एका दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित मोटरसायकलवरून फरार होताना दिसत होते. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या