Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामंद्रूप अपर तहसिल कार्यालय येथे १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह' साजरा होणार

मंद्रूप अपर तहसिल कार्यालय येथे १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह’ साजरा होणार

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ खंडेराव पाटील /पोलीस दक्षता लाईव्ह:- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप अपर तहसिल कार्यालय अंतर्गत एकूण ४३ गांवे आहेत. चार महसूल मंडळे आहेत.येथे १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘महसूल सप्ताह’ करणार साजरा करण्यात येणार आहे. दि.१ ऑगस्ट ‘महसूल दिना पासून दिनांक २६ जानेवारी ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत राबविण्यात आलेल्या “महाराजस्व अभियान अंतर्गत केलेल्या कामाची दखल घेऊन विभागनिहाय उत्कृष्ट काम करणा-या अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी,तहसिलदार,नायब तहसीलदार,अव्वल कारकून,मंडळ अधिकारी,महसूल सहाय्यक,तलाठी,पोलीस पाटील व कोतवाल यांचा उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून त्यांचा गौरव आणि सन्मान करण्यात येणार आहे.

दि.2 आँगस्ट रोजी “युवा संवाद” या उपक्रमातंर्गत दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्दयार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकरीता राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,वय,वर्ष व अधिवास प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र,नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र आदी शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले,प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्जदारांनी दाखल केलेले व प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढून संबंधित अर्जदारांना सदर दाखले,प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

दि.३ आँगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमातंर्गत पूर्व मान्सुन आणि मान्सुन कालावधीत अवकाळी पाऊस अतिवृष्टी,पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे , शेतीचे , फळबागांचे , जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार,बाधीत नागरिकांना देय असलेल्या
सोई सुविधा,नुकसान भरपाई देण्यात आली आहे किंवा कसे,याबाबत सर्व कार्यालयीन आढावा घेऊन पात्र नागरिकांना लाभ देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.

दि.४ आँगस्ट रोजी “जनसंवाद” या उपक्रमातंर्गत महसूल अदालतींचे आयोजन करुन जिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी , तहसिलदार स्तरावर प्रलंबित असलेली प्रकरणे,अपिले निकाली काढण्यात येणार आहे.

दि.५ आँगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी ” या उपक्रमातंर्गत राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी,सैनिक यांना व त्यांच्या कुंटुंबियांना आवश्यक असणारे,महसूल कार्यालयांकडून निर्गमित होणारे विविध दाखले,प्रमाणपत्रे मिळणेबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.

दि.६ आँगस्ट रोजी “महसूल संवर्गातील कार्यरत,सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचारी संवाद” या उपक्रमातंर्गत महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत असलेल्या,सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय,उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनी व्यक्तीशः संबंधितांच्या अडचणी समजून घेऊन त्या निकाली काढण्याच्या अनुषंगाने संबंधितांना सूचना देऊन आवश्यक ते मार्गदशन करण्यात येणार आहे.

दि.७ आँगस्ट रोजी “महसूल सप्ताह सांगता समारंभ” या उपक्रमातंर्गत महसुल यंत्रणेमार्फत उपरोक्त कालावधीत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबतची फलनिष्पत्ती आणि विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेण्यासाठी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.तरी सर्व नागरीकांनी या महसूल सप्ताहाचा लाभ घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद,अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार,उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र.२ विठ्ठल उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुपचे तहसिलदार राजशेखर लिंबारे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या