Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावआई वडिलांचे संस्कार समाजाच्या उपयोगी आणा; संजय सावंत

आई वडिलांचे संस्कार समाजाच्या उपयोगी आणा; संजय सावंत

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- समाजात मोठे होत असताना संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात. आई वडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार हे समाजाच्या उपयोगी आणावेत असे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केले.जैन इरिगेशन, आण्णासाहेब सागरमल सांखला क्रेडिट अर्बन बँक ते शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने उप महानगर प्रमुख सुरळकर यांनी पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

संजय सावंत पुढे म्हणाले की, सध्याचं युग हे स्पर्धेचे युग आहे, यापुढे स्पर्धेत टिकून राहण्याची खूप मोठी कसरत विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. स्पर्धे सोबत आई वडिलांचे संस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. ते समाजाच्या उपयोगी कसे पडतील याचा विचार सगळ्यांनी करावा असेही ते म्हणाले.यावेळी व्यासपीठावर शिवसेना सहसंपरक प्रमुख गुलाबराव वाघ महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत,महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेविका ज्योती तायडे, रेड क्रॉस सोसायटीचे विनोद बियाणी,सुभाष सांखला, डॉ. महाजन युवासेना जिल्हाप्रमुख पियूष गांधी, निलेश चौधरी उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे,युवा सेना उप जिल्हाप्रमुख विशाल वाणी, विधानसभा अधिकारी अमित जगताप, महानगर प्रमुख अमोल मोरे समन्वयक महेश ठाकूर, निलेश देशमुख,निलेश ठाकरे, महिला आघाडी महानगर प्रमुख गायत्री सोनवणे, बेबाबाई सुरळकर,निर्मला चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी राहुल पारचा,भोजराज बारी,कुंदन चौधरी,गणेश पाटील,राहुल कोळी, चेतन मराठे ,मुन्ना मराठे, रवी चौधरी ),आशिष चौधरी,गुड्डू चौधरी, प्रकाश चौधरी, यश मराठे,विशाल पाटील, आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सुरळकर यांनी सूत्रसंचलन विशाल पाटील तर आभार प्रदर्शन उमेश चौधरी यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या