Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावखडके वसतीगृहात अल्पवयीन मुले व मुलींवर लैंगिक अत्याचाराची सखोल चौकशीची मागणी

खडके वसतीगृहात अल्पवयीन मुले व मुलींवर लैंगिक अत्याचाराची सखोल चौकशीची मागणी

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके येथील वसतीगृहात अल्पवयीन मुले व मुलींवर लैंगिक अत्याचाराची सखोल चौकशी करून संशयिताला फाशीची शिक्षा करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली.सध्या हे प्रकरण चांगलेच गाजते असून पावसाळी अधिवेशनात सुद्धा यावर चर्चा झाली आहे. आंदोलन प्रसंगी यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. विविध प्रकारच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर प्रमुख अशोक लाडवंजारी, युवा महानगराध्यक्ष रिकू चौधरी, युवा जिल्हाध्यक्ष सुभान तडवी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या