Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावबोगस खतांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी; राष्ट्रवादी...

बोगस खतांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सरदार कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरल्यामुळे जळगांव, जामनेर, बोदवड तालुक्यातील शेकडो हेक्टर वरील पिक धोक्यात आले आहे. पिके सुकत लागले आहेत.राष्ट्रवादीचे रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील बाधित शेतांची पाहणी केली.आज मंगळवार रोजी रोहिणी खड्से आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी बाधित कपाशीचे रोपे आणि नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठून खतांच्या वापरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना शासनाच्या माध्यमातून किंवा पिक विम्याच्या माध्यमातून हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळावी आणि बाधित शेतीवर शाश्वत उपाययोजना करावी अशी मागणी जळगांव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देऊन केली.

मे सरदार ऍग्रो फर्टिलायझर अँड केमिकल कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट या रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे तिन्ही तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती या बोगस खतामुळे बाधित झाली आहेत.खत टाकलेल्या शेतातील कापसाची वाढ खुंटली तर काही ठिकाणी पिक खराब झाले .यात शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतीची मशागत, बियाणे, खते, खुरपणी, फवारणी, इ. आतापर्यंत शेतकरी बांधवांचा मोठा खर्च झालेला असताना या कंपनीच्या सिंगल सुपर फॉस्फेट खतांच्या वापरामुळे शेतकरी बांधवांचे या हंगामातील पिक वाया गेले आहे.पिकाचे नुकसान झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून शेतकरी हवालदील झाले आहेत.शेतजमीनच बाधित झाली आहे ,यावर मृदा शास्त्रज्ञ यांच्या परीक्षणानुसार त्यात जमीन सुधारणा मोहीम हाती घेऊन बाधित जमिनीवर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी (MREGS ) योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना नजिकच्या तलावातून गाळ माती टाकण्यासाठी मृदा शास्त्रज्ञांच्या शिफारशी नुसार हेक्टरी मापदंड वापरून पुन्हा जमिनीची उत्पादकता वाढवावी ,यातून नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या कुटुंबाला रोजगार मिळेल आणि बाधित जमीन सुपीक होण्यासाठी मदत होईल.शेतकरी बांधवांना यावर योग्य ते मार्गदर्शन करून चालू पिकासाठी तात्काळ हेक्टरी एक लाख मदत मिळवून देण्यात यावी आणि शेतजमीन नापिक होऊ नये यासाठी मृदा शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाने शाश्वत उपाययोजना कराव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री यांच्याकडे केल्याची खडसे यांनी सांगितले.जर शेतकरी बांधवांना योग्य ती मदत मार्गदर्शन मिळाले नाही तर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रोहिणी खडसे यांनी दिला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बोदवड तालुका अध्यक्ष आबा पाटील, जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी,भरत पाटील, निलेश पाटील, विजय चौधरी,सतिष पाटील ,प्रदिप बडगुजर, पाटील,प्रदिप साळुंखे, चेतन राजपूत आदींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या