Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रवन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

चंद्रपूर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- चंद्रपूर -वन्यप्राण्यांच्या, हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली आहे. यापुढे अश्या दुर्घटनेत व्यक्ती मृत पावल्यास त्याच्या वारसांना २५ लक्ष रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत केली.यासंदर्भात शुक्रवारी सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात निवेदन करताना स्पष्ट केले की, राज्यात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली असून मानव वन्य जीव संघर्षामध्येही वाढ होत आहे .हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन-विकास योजने अंतर्गत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे.

मनुष्यहानीच्या वाढत्या घटनांमुळे कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूमुळे, व्यक्तीला गंभीर अपंगत्व आल्यामुळे त्या कुटुंबाचे मोठे नुकसान होते; याची दखल शासनाने संवेदनशीलपणे घेतली आहे.यांसंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार व्यक्तीला कायम अपंगत्व आल्यास ७ लाख ५० हजार रुपये, व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास ५ लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषधोपचारासाठी येणार खर्च देण्यात येणार आहे. ३ ऑगस्ट, २०२३ रोजी हा निर्णय निर्गमित केला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात घोषणा केली. मुनगंटीवार यांनी निवेदनात म्हणाले की, सध्याच्या आर्थिक तरतूदीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, कायमस्वरुपी अपंगत्व, गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी व्यक्तीला द्यावयाची आर्थिक मदत त्या मानाने कमी असल्याबाबत व त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. लोकप्रतिनिधींकडून आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत मागणीही होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या