Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeक्राईमअहमदनगरच्या निंबळक शिवारात निवृत्त लष्करी जवानाचा खून; दोघांना भोपाळमधून घेतले ताब्यात

अहमदनगरच्या निंबळक शिवारात निवृत्त लष्करी जवानाचा खून; दोघांना भोपाळमधून घेतले ताब्यात

अहमदनगर/विशेष प्रतिनिधी / पोलीस दक्षता लाईव्ह:- अहमदनगर -प्लॉट खरेदीच्या वादातून एका निवृत्त लष्करी जवानाचा अहमदनगर तालुक्यातील निंबळक शिवारात धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विठ्ठल नारायण भोर (वय ४८, रा. गणेश चौक, बोल्हेगाव, ता. नगर) असे खून झालेल्या जवानाचे नाव आहे. आरोपींनी त्यांचा खून करून मृतदेह राहाता तालुक्यातील गोगलगाव शिवारातील एका शेतात फेकून दिला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मनोज वासुमल मोतीयानी (वय ३३) व स्वामी प्रकाश गोसावी (वय २८, दोघे रा. सावेडी गाव, अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. राहाता तालुक्यातील लोणी ते तळेगाव रस्त्यावरील गोगलगाव शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.अनोळखी व्यक्तीने धारदार शस्त्राने खून करून मृतदेह या ठिकाणी फेकून दिल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार लोणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले.त्यानुसार आहेर यांच्या पथकाने चारचाकी वाहनाच्या टायरच्या खुणा, तसेच सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार आरोपी खून करून भोपाळला (मध्य प्रदेश) पसार झाल्याचे समोर आले. पोलिसांनी मध्य प्रदेशातील सेंधवा येथून आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, फुरकान शेख, रणजित जाधव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड आदींनी ही कारवाई केली.बेपत्ताची फिर्याद अन्‌ तपासाला गतीविठ्ठल भोर बेपत्ता झाल्याबाबतची फिर्याद त्यांच्या कुटुंबाने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली होती. बेपत्ता व्यक्ती आणि अनोळखी मृत व्यक्ती यांचे वर्णन मिळते जुळते असल्याचे गुन्हे शाखेच्या निदर्शनास आले. तेथूनच तपासाला गती मिळाली.मोतीयानी सराईत गुन्हेगार आरोपी मनोज मोतीयानी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात विनयभंग, अल्पवयीन मुलीस पळवून नेणे, खंडणीच्या उद्देशाने ठार मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे व ठार मारण्याची धमकी देणे, असे गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.स्क्रू-ड्रायव्हरने खून विठ्ठल भोर व मनोज मोतीयानी यांचा प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचा व्यवहार होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले. मोतीयानी याने स्वामी गोसावी याच्या मदतीने भोर यांच्या छातीवर स्क्रू-ड्रायव्हरने हल्ला करून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह कारमधून नेऊन लोणी (ता. राहाता) परिसरातील पेट्रोल पंपाजवळील शेतात फेकून दिला. त्यानंतर आरोपी भोपाळच्या दिशेने पसार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या