अमरावती/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मेळघाट मतदारसंघातील बुरडघाट येथे असणाऱ्या आदिवासी पाड्यातील गांजू रामजी झामरकर हा युवक गेल्या १२ ते १५ वर्षांपासून मनोरुग्ण असल्याने हात आणि पायात बेड्या घालून बंदिस्त अवस्थेत होता असे समजल्यानंतर आमदार राजकुमार पटेल यांनी त्यास पूर्णतः सहकार्य केले आहे.अत्यंत कठीण परिस्थितीत कोणाच्याही मदतीविना त्याची आई त्याची शुश्रूषा करत असे, ही गोष्ट गंभीर असून याबाबत पंधरा दिवसांपूर्वी माहिती मिळाली. या अनुषंगाने प्रत्यक्ष जागी जाऊन आ.पटेल यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.यानंतर झामरकर कुटुंबाला दिलेल्या शब्दानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयास निवेदन देण्यात आले होते. आज याची नोंद घेत रुग्णालय कर्मचाऱ्यांनी या युवकास प्रथमतः अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात व तद्नंतर पुढील उपचारांसाठी नागपूर येथे नेण्यात आले आहे.भविष्यातही वेळोवेळी रुग्णाच्या आरोग्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असून कुटुंबास सर्वतोपरी सहकार्य करण्यास आम्ही कटिबद्ध असू अशी ग्वाही आमदार यांनी दिली.त्यांचे कौतुक होत आहे.