Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईममुख्याध्यापकपदाचा चार्ज घेवू नये म्हणून नशिराबादच्या शिक्षकास मारहाण.!

मुख्याध्यापकपदाचा चार्ज घेवू नये म्हणून नशिराबादच्या शिक्षकास मारहाण.!

जळगाव /प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद शिक्षण क्षेत्रात गेल्या महिन्यात अनेक गैरव्यवहार व लज्जास्पद घटना समोर आलेल्या असतानाच जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील उर्दू शाळेत मुख्याध्यापकपदाचा चार्ज घेवू नये म्हणून एका उपशिक्षकाला रस्ता अडवून त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिकृत माहिती अशी की, मेहरूण परिसरातील अक्सानगर भागात जळगाव येथे राहणाऱ्या ४८ वर्षीय शिक्षक शेख साबीर अहमद खलीलोदिन हे ११ऑगस्ट रोजी के.एस. टी उर्दू हायस्कूल नशिराबाद येथे मुख्याध्यापकपदाचा चार्ज घेऊ नये यासाठी आरोपी वसीम अक्रम शेख मुसा रा. नशिराबाद याने सकाळी आठ वाजेच्या सुमारास उर्दू हायस्कूल नशिराबाद येथे शेख साबीर यांना अडवून मारहाण केली. स्टाफ रूम मध्ये मारहाण केली ” तू शाळेत कसा येतो “, अशी धमकी देऊन ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला वसीम अक्रम शेख मुसा याचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या