जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव ते पंढरपूर 490 किमी ची सायकल वारी 2023 (दुसरी वारी) 3 दिवसात पूर्ण केल्याबद्दल स्वामिनी फाऊंडेशन संचलित ‘लेवा सखी घे भरारी’तर्फे संस्थेच्या 5 व्या वर्धापनदिन कार्यक्रमांत तसेच दि. 12 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या “एक राईड प्रतापराव पाटील सरांसाठी” या कार्यक्रमात पंढरपूर वारी 2023 पूर्ण केल्याबद्दल विनोद पाटील, कुलसचिव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कामिनी धांडे या सायकलपटू असून हजारो किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला आहे.त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.