Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमतेरामैल येथे विनापरवाना गाईच्या मासाच्या तुकड्यांची वाहतूक करणाऱ्यांवर मंद्रूप पोलिसात गुन्हा दाखल,...

तेरामैल येथे विनापरवाना गाईच्या मासाच्या तुकड्यांची वाहतूक करणाऱ्यांवर मंद्रूप पोलिसात गुन्हा दाखल, 3 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सोलापूर/ खंडेराव पाटील/ पोलीस दक्षता लाईव्ह:- मंद्रूप येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने मंद्रूप पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दि.11 आँगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तेरामैल येथे पीएसआय करपे,पो.काँ चव्हाण आणि पो.काँ नागरगोजे यांनी जनावरांची अवैध वाहतूक करण्यार्‍या छोटा हत्ती वाहनाला अडवले.आरोपी सलमान उस्मान मुल्ला,(वय वर्षे 30),रा.संजय गांधीनगर झोपडपट्टी नं 2,विजापूर नाका,सोलापूर व त्यांच्या सोबत असलेला सलमान अयुब खान (वय वर्षे 23),राहणार चाँद तारा मस्जिद,विजापूर नाका,सोलापूर,वाहीद महम्मद हनीफ कुरेशी (वय वर्षे 45),राहणार बेगमपेठ,सोलापूर यांना ताब्यात घेतले.पोलिसांनी या वाहनांच्या पाठीमागील हौदात पाहिले असता हौदामध्ये बर्फाचे लादी लावुन त्यावर गाईच्या मांसाचे तुकडे असल्याचे त्यांना दिसून आले. वाहन चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याने मालक जुनेद कुरेशी,रा.विजापूर नाका,सोलापूर यांचा आहे. सोलापूर ते इंडी असे घेवून जात असल्याचे सांगितले.

या कारवाईत 20 हजार रुपये किंमतीचे अंदाजे 100-120 किलो गाईच्या मांसाचे तुकडे, 3 लाख 15 हजार रुपये किंमतीचे एक अशोक लेलेंड कंपनीचा छोटा हत्ती वाहन त्याचा क्रमांक MH-25AJ 4034 असा एकूण 3 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मंद्रूप पोलिसांनी जप्त केलेआहे. बेकायदेशीर रित्या पाळीव जनावरांचे कत्तल करुन सदर मासांचे तुकड्यांमुळे सुटलेल्या दुर्गधीमुळे लोकांच्सा जिवीतास धोका होण्यासारखे संसर्गजन्य रोगराई पसरण्याची शक्यता आहे.हे माहीत असताना देखील गाईचे जनावरांचे मांसाचे तुकडे हयगईने निष्काळजीपणे ताब्यात घेवुन विनापरवाना अशोक लेलेंड कंपनीचा एक छोटा हत्ती या वाहनामध्ये विक्री करीता घेवुन जात असताना मिळुन आला आहे.म्हणून सदर आरोपीं विरुद्ध मंद्रूप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पीएसआय करपे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या