जळगाव/तेजस भंगाळे/पोलीस दक्षता लाईव्ह:- दिनांक 11/07/2023 रोजी रात्री 12.00 वा. चे सुमारास हिमांशु शशिकात कुटे, वय 25 वर्षे, रा. महाबळ जळगाव व देवेश संजय चव्हाण हे मेहरुण तलावा जवळ बसले असतांना एक सी.बी शाईन कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच 19 डी.एम 3278 वर 04 अनोळखी इसमांनी येउन त्यांनी चाकुचा धाक दाखवुन 29,000 रुपये किमतीचा व प्लस मोबाईल व 10,500 रुपये कि चा मोबाईल असे बळजबरीने घेवुन गेले होते व हिमांशु कुटे यांना पाठीवर व मांडीवर चाकु मारुन गंभीर दुखापत केली होती सदर बाबतीत दिनांक 13/07/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तपासात यापुर्वी 03 आरोपींना अटक करण्यात आली होती त्यांच्या सोबत असलेला 04 था साथीदार अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद रा. सुप्रिम कॉलनी जळगाव हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता तो रेर्काडवरील असुन त्यांच्यावर यापुर्वी 12 गुन्हे दाखल असुन त्यांचा शोध सुरु होता तो शाहु नगर येथे आल्याबाबतची माहिती मा. पोलीस निरिक्षक श्री जयपाल हिरे सो. यांना मिळाल्यावरुन त्यांस शाहुनगर जळगाव येथुन दिनांक 12/08/2023 रोजी रात्री 10.00 वाजता सफो / 1428 अतुल वंजारी, ईम्रान सैय्यद, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, मुकेश पाटील, मुदस्सर काशी, साईनाथ मुंढे अशांनी ताब्यात घेतल होते त्यांस अटक करण्यात येउन त्यास न्यायमुर्ती सुवर्ण कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउनि / रविंद्र गिरासे, पोहेकॉ / सचिन मुळे करीत आहे.

