जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- आज जळगाव येथील संस्कृती माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये सर्वधर्मसहिष्णुता समभाव राष्ट्रभक्ती यासारखी मूल्ये रुजावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पंडित नेहरू तसेच मदर टेरेसा अशा विविध प्रकारच्या वेशभूषा करण्यात आल्या. प्रभात फेरी दरम्यान विविध घोषणांनी शालेय परिसर दुमदुमून गेला. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे के एन डेव्हलपरचे अध्यक्ष माननीय श्री.किशोर बेहेरानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री ज्ञानेश्वर दादा नाईक, माननीय श्री.विजय सुखराम जवरे, माननीय श्री.जितेंद्र शामराव राजपूत, तसेच जय दुर्गा ग्रुपचे सदस्य श्री.अनिल दादा पाटील हे उपस्थित होते. माननीय श्री किशोर बेहेरानी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून उस्पर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाप्रसंगी माजी विद्यार्थी आणि पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .