Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचांदवडला श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे उसळली भाविक -भक्तांची उदंड गर्दी...

चांदवडला श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे उसळली भाविक -भक्तांची उदंड गर्दी…

चांदवड/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- प्राचीन श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथील श्री चंद्रेश्वर महादेव मंदिरात पहाटे पासूनच भाविक भक्तांनी गर्दी केली होती. पहाटे चंद्रेश्वर महादेवास महाअभिषेक करण्यात आला. यावेळी गडाचे सहाय्यक व्यवस्थापक स्वामी जयदेवपुरी महाराज यांचे हस्ते शास्त्रोक्त पूजा करण्यात आली. तसेच गडावर संध्या-आरतीचे विशेष आसे महत्त्व आहे. आरतीच्या वेळेस महादेवाची पिंडीस शृंगार केला जातो व दीपोत्सव करत महाआरती करण्यात येते.” भगवान चंद्रदेव यांची तपोभूमी असल्याने परम पुण्यक्षेत्री भगवान महादेव यांनी चंद्रदेवांना शापमुक्ती देत या क्षेत्री लिंगस्वरूपात विराजमान झाले. ” याठिकाणच्या शिवलिंगावर केवळ जलाभिषेक केला तरी कुंडलीतील चंद्रदोष नाहिसा होतो अशी मान्यता आहे.अशा परम पुण्य श्रीक्षेत्री दिवसभर भाविक-भक्तांनी मोठी गर्दी केली होती व संध्या-आरतीतही असंख्य भाविक सहभागी झाले. यावेळी चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या वतीने भाविकांसाठी सेवा पूरविण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या