Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeराजकारणभीमशक्ती संघटनेची श्रीरामपूरला बैठक, उत्कर्षा रूपवतेंच्या उमेदवारीसाठी आग्रह

भीमशक्ती संघटनेची श्रीरामपूरला बैठक, उत्कर्षा रूपवतेंच्या उमेदवारीसाठी आग्रह

श्रीरामपूर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री मा. चंद्रकांत हांडोरे साहेबांच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेची बैठक संपन्न झाली. बैठकीसाठी कार्यकर्ते श्रीरामपूर येथे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकांविषयी विस्तृत चर्चा झाली.भीमशक्ती संघटनेच्या सर्वच कार्यकर्त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उत्कर्षा रुपवतेना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला. त्यावर उत्कर्षा रुपवते यांनी सर्वांचे आभार मानत मी तुमची आभारी आहे. व आधीच साथ तुमची माझ्यासोबत असेल अशी मला खात्री आहे असे त्या म्हणाल्या.यावेळी संघटनेतील अनेक नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणूकाही करण्यात आल्या.लवकरच श्रीरामपूर येथे मा. हांडोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे, त्या संदर्भातल्या नियोजनाची ही चर्चा झाली.यावेळी भीमशक्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस मा. भाऊसाहेब साठे, जिल्हाध्यक्ष मा. संदीप मगर, राज्य संघटक मा. शिमोन जगताप, मा. सुदाम सरोदे, युवक जिल्हाध्यक्ष मा. पप्पू कांबळे, मा. धोंडे पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या