Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावलेप्टोस्पायरोसिस’ आजाराचा जळगाव जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण

लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचा जळगाव जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर तालुक्यातील डांगरी गावात चार वर्षाच्या बालकाला ‘लेप्टोस्पायरोसिस’ नामक आजाराची लागण झाल्याचे वृत्त आहे. जळगाव जिल्ह्यात व अमळनेर तालुक्यात पहिल्यांदाच “लेप्टोस्पायरोसिस” या आजाराचा रुग्ण आढळला असून “लेप्टोस्पायरोसिस” हा आजार दूषित पाण्यापासून होणारा तसेच पसरणारा आजार आहे.

लेप्टोस्पायरोसिस आजार कसा ओळखायचा….

सतत आजारी असणारे प्राण्यांच्या लघवीद्वारे ‘लेप्टोस्पायरोसिसचा’ प्रसार होतो, हा आजार झाला असता या आजारात तीव्र डोकेदुखी,तीव्र ताप, डोळे लालसर होणे, अंगदुखी अश्या प्रकारची लक्षणे आढळतात. मुख्यतः हा आजार ऊस लागवडीच्या क्षेत्रात आढळतो. या रोगाचे रुग्ण, रत्नागिरी, ठाणे, रायगड, पालघर आदी भागांत जास्त आढळून येतात. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामध्ये प्रथमच अशा आजाराचा रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम आरोग्य विभागामार्फत केले गेले पाहिजे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या