अमळनेर/ धवल वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर शहरातील नर्मदा फौंडेशन येथे रुग्ण तपासणी वरुण विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आणि डॉक्टर अनिल शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून पुणे शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. डॉक्टरांना रुग्ण तपासणी कामापासून रोखण्यात येऊन वैद्यकीय क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून डॉ अनिल शिंदेंसाठी आय.एम.ए , निमा, होमियोपॅथी, डेंटल असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, लॅबोरेटरी असोसिएशन , इलेक्टरोपॅथी असोसिएशन तसेच डॉ.निखिल बहुगुणे, डॉ. अविनाश पवार, डॉ. शरद बाविस्कर, डॉ. सुमित सूर्यवंशी, डॉ. राहुल मुठे, डॉ. दिनेश महाजन, डॉ. मिलिंद नवसारीकर, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. संदीप दीपक धनगर, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. एजाज रंगरेज, डॉ. हेमंत कदम, डॉ. रईस बागवान, चेतन पाटील, तुषार परदेशी, डॉ. संजय जैन, डॉ. विजय पवार, डॉ. राजन पाटील, डॉ. पी. सी. चव्हाण, डॉ. संजय मुसळे, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. महेश पाटील यांच्यासह ८० डॉक्टरांच्या निवेदनावर सह्या आहेत.प्रांताधिकारी श्री.खेडकर यांना निवेदन देण्यात आले.