जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पाचोरा शहरात नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन महिन्यांपासून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात मे २०२३ पासून ते आतापर्यंत गेल्या दोन महिन्यांपासून त्याच परिसरात राहणारा आरोपी सतीश शेजवळ याने वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांनी हा प्रकार पीडित मुलीने घरच्यांना सांगितल्याने पीडित मुलीसह घरच्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सतीश शेजवळ याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहे