जळगाव/ प्रतिनिधी /पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री रेवाबाई पाटील यांनी आज वयाच्या ७५ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.पाळधी मध्ये वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.त्यांच्या आत्म्याला शांती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबियांना एवढं मोठं दुःख सहन करण्याची ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पोलीस दक्षता लाईव्ह तर्फे रेवाबाई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली