Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगावच्या रामनगरात क्षुल्लक कारणावरून तरुणास बेदम मारहाण

जळगावच्या रामनगरात क्षुल्लक कारणावरून तरुणास बेदम मारहाण

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  शहरातील रामनगर परिसरात एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन १९ वर्षीय तरुणाला तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील महादेव मंदिर परिसरात अरमान रईस बागवान हा तरुण राहतो, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अरमान हा आमच्याकडे पाहतो, या कारणावरून त्याला आकीब पटेल याच्या दोन जण अशा तीन जणांनी सायंकाळी सात वाजता रामनगर परिसरातील रस्त्यावर मारहाण केली. यादरम्यान चाकू सारख्या लोखंडी हत्याराने अरमान याच्या डोक्यावर, पाठीवर व छातीवर मारहाण करुन दुखापत केली, या घटनेत अरमान बागवान हा जखमी झाला आहे, याप्रकरणी अरमान याने दिलेल्या तक्रारीवरुन आकीब पटेल याच्यासह इतर दोन जण अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या