चांदवड/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- चांदवड शहर व परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून पावसाची प्रतीक्षा होती. परंतु श्रीकृष्ण जन्माष्टमी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू झाली व गोपाळकाल्याच्या दिवशी पावसाचे जोरदार कमबॅक झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांसमोर पावसाच्या पाण्याने तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पावसाचे पाणी गाळ्यांच्या शटरपर्यंत भिडल्याने व्यापारी वर्गाकडून प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. याबद्दल व्यापारी वर्गाने मार्केट कमिटी कडे विचारणा केली असता त्यांनी हे काम आमचे नाही तर नगरपरिषद कडील काम असल्याचे तक्रारदारांना सांगितले. नगरपरिषद कडे व्यापारी वर्गाने विचारणा केली असता त्यानी हेच काम msrdc चे काम असल्याचे सांगितले. तिन्ही प्रशासन टोलवाटोलवी करीत असल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. तिन्ही प्रशासनामार्फत असे उत्तर मिळाल्यामुळे हे काम निश्चित कोणाचे हा प्रश्न मात्र कायम आहे. सदर व्यापाऱ्यांनी त्यांच्या संतप्त भावना आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.