Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावभुसावळ परिसरात घरफोड्या करणारी टोळी जेरबंद; भुसावळ पोलिसांची कामगिरी

भुसावळ परिसरात घरफोड्या करणारी टोळी जेरबंद; भुसावळ पोलिसांची कामगिरी

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी भुसावळ शहराच्या हद्दीत सात ठिकाणी घरङ्गोड्या करून रोकड सह सोने, चांदीचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद केली आहे. अटक केल्यानंतर आरोपींकडून दोन लाखांच्या मुद्देमाल, व गॅस सिलींडरही जप्त केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, भुसावळ परिसरात घरफोडी झाल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसासह तालुका, शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द 7 गुन्हे दाखल करण्यात आले होते. भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहा.पो.निरी. हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पो.हे.कॉ. विजय नेरकर, पो.हे.कॉ. सुनिल जोशी, पो.हे.कॉ. निलेश चौधरी, पो.हे.कॉ. यासीन पिंजारी, पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, पो.हे.कॉ. रमन सुरळकर, पो.हे.कॉ. महेश चौधरी, पो.कॉ. प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, प्रशांत सोनार, अमर अढाळे अशांनी घरफोड्या मधील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन शेख मुश्ताक शेख अनवर, वय २३ वर्षे, सोहेल शेख अय्युब, वय १८ वर्षे, आफताफ शेख समीउल्ला, वय २२ वर्षे, जुबेर शेख कमरू, वय २६ वर्षे, आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवुन घरफोड्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी संगनमताने आतापर्यंत 7 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

आरोपींकडून मुद्देमाल जप्त

झालेल्या कारवाईत आरोपींकडून एकुण कि.रू.२,०६,०००/- चे सोन्याचे व चांदीचे दागीने मोबाईल फोन, व गॅस सिलेडर जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना दि.१० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. भुसावळ बाजारपेठ व भुसावळ तालुका पो.स्टे.ला गुन्हा दाखल असलेल्या घरफोड्यांपैकी एकुण 7 घरफोड्या पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहा.पो.निरी. हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पो.हे.कॉ. सुनिल जोशी, पो.हे.कॉ. विजय नेरकर, पो.हे.कॉ. निलेश चौधरी, पो.हे.कॉ. यासीन पिंजारी, पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, पो.हे.कॉ. रमन सुरळकर, पो.हे.कॉ.महेश चौधरी पो.कॉ. प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, प्रशांत सोनार,यांनी घरफोड्या मधील अज्ञात आरोपींचा कसून शोध घेत आरोपींना अटक करून गुन्हे उघडकीस आणले आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या