Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमशासकीय कामात अडथळा; अंगणवाडी सेविकेला ढकलले गटारीत; दोघांवर गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा; अंगणवाडी सेविकेला ढकलले गटारीत; दोघांवर गुन्हा दाखल

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर येथे बुधवार, 7 रोजी सकाळी 9.30 वाजता भुसावळ तालुका पोलिसात शासकीय कर्तव्यात अडथळा आणत अंगणवाडी सेविकेच्या कामात व्यत्यय आणून तिच्याशी अरेरावी करीत तिला ढकलून देण्यात आल्याची घटना घडल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

सविस्तर वृत्त असे की, बुधवार दि.6 रोजी सकाळी 9.30 ते 10.30 च्या दरम्यान भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर येथे पितांबर दरबार पवार यांनी अंगणवाडी सेविका सुरेखा बाळू बाविस्कर या शैक्षणिक कामात कर्तव्यावर असतांना तुम्ही अंगणवाडी उघडण्यास उशीर का केला? म्हणून त्यांच्याशी वाद घालत शासकीय कामात अडथळा आणला. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास बाविस्कर या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवीत असतांना गणेश पुनमचंद पवार हे तेथे आले व त्यांनी अंगणवाडी मध्ये येत हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा आणत दमदाटी केली.

यावेळी गणेश पुनमचंद पवार यांनी बाविस्कर यांना ढकलून दिल्याने अंगणवाडी सेविका या गटारीत पडल्या. त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. या घटनेनंतर सुरेखा बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री 8 वां. पितांबर दरबार पवार व गणेश पूनमचंद पवार (रा.मांडवेदिगर, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या