जामनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- तालुक्यातील वाघारी येथील ही घटना असून, स्वतःच्या आई-वडिलांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिचा बालविवाह तिच्या आत्याच्या मुलाशी लावून दिला. काही दिवस लोटल्यानंतर विवाहसंबंधातून ती अल्पवयीन तरुणी गर्भवती राहिल्यामुळे हे बिंग फुटले. वर्षभरापूर्वी २०२२ मध्ये जून महिन्यात पीडित तरुणीचा बालविवाह करून देण्यात आला होता. विवाह करतेवेळी तरुणीचे वय १७ वर्षे ११ महिने होते. पीडित तरुणीचे आई-वडील छायाबाई राजू सरताळे (वय ४०) आणि राजू हरी सरताळे (वय ५०) दोन्ही रा. वाघारी यांनी तरुणीची आत्या कोकीळाबाई गणेश उदने (वय ४५), मामा गणेश श्याममल उदने (वय ५५) दोन्ही रा. अजिंठा ता.सिल्लोड यांच्याशी संगनमत करून उदने यांचा मुलगा शंकर गणेश उधने (वय २३) याच्याशी बालविवाह लावून दिला. त्यानंतर पीडित तरुणी ही वाघारी येथे राहत होती. तेथे तिच्या आत्याच्या मुलाने ती अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही तिच्याशी संबंध ठेवले. त्यानंतर ते पुणे येथील कात्रज परिसरात संतोष नगरात राहायला गेले. त्यांच्या संबंधातून पीडित तरुणीही गर्भवती राहिली. याबाबत भारती हॉस्पिटल, पुणे यांनी याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला कळविल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पुणे येथील हेड कॉन्स्टेबल रवींद्र ओझय्या चप्पा (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला पीडित तरुणीचे आई-वडील, आत्या-मामा व पीडित तरुणीचा पती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे हे करीत आहेत.