अमळनेर/धवल वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:-अमळनेर तालुक्यातील मालपूर येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. नरेंद्र शांताराम पाटील यांची निवड झाली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या गावांसह तालुक्यातून आनंद व्यक्त केला जात आहे. डॉ. नरेंद्र पाटील हे उधना लिंबायत भागात नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. डॉ नरेंद्र आणि त्यांच्या पत्नी गेल्या २५ वर्षांपासून भाजपच्या पदाधिकारी असून समाजसेवेत अग्रेसर आहेत. तसेच ते वैद्यकीय व्यवसायातून देखील जनतेची सेवा करत आहेत. त्यांच्या जनसेवा वृत्तीमुळेच पक्षाच्या वरिष्ठांनी प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या निर्देशानुसार त्यांच्यावर सुरत महापालिकेचे उपमहापौर म्हणूनजबाबदारी सोपवली आहे.
डॉ. नरेंद्र पाटील यांच्या निवडीने खान्देशातील गुजरात येथील नागरिकांच्या समस्या सुटण्यास मार्ग सुकर झाला असल्याने खान्देशवासीयांना आनंद झाला आहे. मालपूर सारख्या एका लहान गावातील अहिराणी भाषिक व्यक्तीला गुजरात मधील मोठ्या शहराची उपमहापौर पदाची जबाबदारी दिल्यामुळे नरेंद्र पाटील यांच्यामुळे अमळनेर तालुक्याची मान उंचावली आहे. त्यांच्यावर तालुक्यातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.