धुळे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- – धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीची जनसंवाद यात्रेची समारोप सभा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडली. या सभेस जमलेल्या प्रचंड जनसमुदायास त्यांनी संबोधित केले.दुलारी गार्डन नकाणे रोड येथे संपन्न झालेल्या या सभेला नागरिकांची झालेली गर्दी व भरभरून मिळणारा प्रतिसाद आत्मविश्वास वाढविणारा होता.यावेळी आमदार कुणाल बाबा पाटील, जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्यासह धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे विविध फ्रटंल सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनसंवाद यात्रेची समारोप सभा धुळे येथे संपन्न
RELATED ARTICLES