भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:– शहरातील गडकरीनगर तुळजा भवानी मंदिराजवळ खडका रोड येथील माधुरी विजय कुलकर्णी यांच्या राहत्या घरी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी घरात घुसून फिर्यादिस मारहाण केली. घरातील एक लाख रुपये रोख,छत्तीस हजार रुपये किंमतीचे कानातील साखळी, सोन्याचे झुमके प्रत्येकी दोन नग, तीस हजार रुपये किंमतीचे दोन सोन्याच्या अंगठ्या बारा हजार रुपये किंमतीचे सोन्याचे डोरले तसेच अँल्युमिनियमच्या डब्यात असलेले मंदिराचे जमा असलेले पाच हजार रुपये रोख असे एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल पंचवीस ते तीस वयोगटातील दोन अनोळखी व्यक्तींनी चोरून नेला आहे. म्हणून माधुरी विजय कुलकर्णी ( सेवानिवृत्त) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरात घरफोडी सत्र सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे ,पोलिस निरीक्षक नजन किसन पाटील ,पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी भेट दिली.