Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावऔद्योगिक प्रशिक्षण संस्था यावल येथे पदवी प्रदान कार्यक्रम

औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावल येथे पदवी प्रदान कार्यक्रम

यावल/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- व्यास शिक्षण मंडळ प्रणित औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावल येथे पदवी प्रदान कार्यक्रम नुकताच संप्पन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे .टी . महाजन इंग्लिश मेडिअमचे प्राचार्य डॉ . किरण खेटे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्राचार्य गिरीश वाघुळदे , प्रविण झोपे उपस्थित होते . विजतंत्री ,जोडारी आणि संधाता या विभागातून प्रथम येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यास गोल्ड मेडल , द्वितीय येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यास सिल्व्हर मेडल आणि तृतीय येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यास ब्राँझ मेडल देऊन तसेच उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यास प्रमाण पत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. श्री.वाघुळदे आणि चौधरी यांनी प्रशिक्षणार्थ्यास आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले तसेच भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे गटनिदेशक प्रमोद बुरुजवाले , सूत्रसंचालन राजेश फेगडे तर आभार जितेंद्र चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीसाठी संस्थेच्या कर्मचारी बंधूनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या