जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरिश महाजन यांनी ई पिक पाहणीचा पेरणी अहवाल अंतिम धरून विमा नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.भाजपा जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, पदाधिकारी आणि शेतकरी यांनी संयुक्तिक बैठक आयोजित करून विषय मार्गी लावला आहे.३७ हजार हेक्टर क्षेत्र तात्काळ मंजूरी देण्याच्या जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या विमा कंपनीस लेखी सूचना करण्यात आल्या. नुकसान भरपाई तात्काळ जमा न केल्यास १२ टक्के विलंब शुल्क देण्याची मागणी मान्य झाली.
बैठकीस मदत कार्य व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी.चलवदे, भाजपा जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष गोपाल भंगाळे, मिलींद चौधरी,किशोर चौधरी, हर्षल चौधरी, भाऊसाहेब पाटील, डॉ.सत्वशील पाटील, गजानन सोनवणे, तंत्र अधिकारी गणपतराव घोंगडे, विमा कंपनी जिल्हा प्रतिनिधी राहुल पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.