पुणे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- -देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने “माझी माती, माझा देश” मातीला नमन, वीरांना वंदन या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरून भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास प्रदेश महामंत्री अनुप मोरे, प्रदेश महामंत्री सुदर्शन पाटसकर, प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे, प्रिया पवार, अजिंक्य टेकावडे, श्रीराज ढेरे, वीरेंद्र माने, प्रदेश सचिव अजित कुलथे, तेजस्वीनी कदम,पांडुरंग वहीले, रवी तिवारी, सौरभ कुंडलिक, रौनक शेट्टी अनिकेत हरपुडे प्रवीण फोंडे विद्यार्थी विभाग संयोजक रमाकांत कापसे, प्रशांत सपकाळे, स्वप्निल काळे, भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुत्ते पाटील जुन्नर विधानसभा प्रमुख आशाताई बुचके मंडल अध्यक्ष संतोष नाना खैरे, पुणे उत्तर जिल्हा अध्यक्ष संदीप सातव, जय शेकावत, सुशांत पाटील, नवनाथ भुजबळ, धैर्यशील बदाले पाटील, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.