Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रमुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे...!

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे…!

मुंबई /प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  महानगरपालिकेच्या इतिहासात आजवर कधीही आयुक्तपदी महिला अधिकारी विराजमान झाल्याचे उदाहरण नाही. पण, विद्यमान आयुक्त आय. एस. चहल हे सध्या रजेवर असल्याने किमान या कालावधीसाठी तरी अश्विनी भिडे यांच्याकडे कार्यभार असल्याने प्रभारी का होईना महानगरपालिकेला महिला आयुक्त लाभल्या आहेत.

सध्या अश्विनी भिडे या महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांच्याकडे कोस्टल रोड, रस्ते, पूल आदी महत्त्वाचे विषय आहेत. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने सुरू असलेल्या मेट्रो-३ या प्रकल्पाचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे. धडाडीच्या अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात. सध्या त्या आयुक्त म्हणून पालिका प्रशासनाच्या बैठका घेत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडील मेट्राेचा पदभार काढून घेतला गेला. मात्र शिंदे – फडणवीस सरकार येताच पुन्हा त्यांना मेट्राेचा पदभार देण्यात आला आणि आता त्या प्रभारी का असेना मुंबई महापालिकेच्या आयुक्त झाल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या