Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईममंदिरारात चोरी...! पंचधातूची देवीची मूर्ती; पितळी पादूका लंबविल्या

मंदिरारात चोरी…! पंचधातूची देवीची मूर्ती; पितळी पादूका लंबविल्या

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरात असलेल्या प्रेमनगर येथील श्री सप्तश्रृंगी मंदिरात चोरट्यांनी चोरी करीत देवी मूर्तीसह पितळी पादुका लांबविल्या. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरात प्रेमनगर येथे श्री सप्तश्रृंगी देवीचे मंदिर असून चोरट्यांनी या मंदीरात असलेल्या २५ हजार रुपये किंमतीची पंचधातूची देवीची मूर्ती आणि ९०० रुपये किंमतीच्या पादूका अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या. मंदिराचे पूजारी भूषण किशोर जोशी यांना हा प्रकार लक्षात येताच २० सप्टेंबर बुधवार रोजी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पूजारी भूषण किशोर जोशी यांनी तक्रार दिली. पुढील तपास हवालदार भारती देशमुख करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या