Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeक्राईमविवाहितेला अश्लील हातवारे, पतीसह नंदोईविरुध्द गुन्हा

विवाहितेला अश्लील हातवारे, पतीसह नंदोईविरुध्द गुन्हा

जळगाव : कौटुंबिक वादाच्या तारखेवर न्यायालयात आलेल्या विवाहितेला तिच्याच पती व नंदोईने अश्लील हातवारे करून विनयभंग केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात पती व नंदोईविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कौटुंबिक वादामुळे पीडित महिला ही पतीपासून तीन वर्षांपासून विभक्त राहत आहे. तर कौटुंबिक वादाचा खटला हा न्यायालयात सुरू असल्यामुळे मंगळवारी महिला ही कुटुंबासोबत न्यायालयात तारखेवर आली होती. तर तिचा पती व नंदोई देखील न्यायालयात आले होते. दुपारी दोघांनी पीडित महिलेला पाहून अश्लील हातवारे केले. त्यानंतर पाठलाग करून शिवीगाळ केली. पीडितेने दुपारी शहर पोलिस ठाणे गाठून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. तसेच प्रत्येक तारखेला जाणून-बुजून पती व नंदोई मानसिक त्रास देत असल्याचेही सांगितले. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या